fbpx
 • तुमचे विचार निश्चित असू द्या. माझ्याशी बोलताना तुम्ही ठामपणे बोला. तसं झालं की मला सुरक्षित वाटतं.

 • मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तेव्हा मला धुडकावून लावू नका. तुम्ही तसं केलंत तर माझे प्रश्न बंद होतील आणि मी उत्तरं दुसरीकडून कुठूनतरी मिळवीन.

 • चारचौघांदेखत मला माझ्या चुका दाखवू नका, तुम्ही मला एकट्याला बाजूला घेऊन समजावलेत तर ते मला चांगलं समजेल.

 •  माझ्या सारखं मागे लागू नका. तसं केलंत तर मला ऐकूच येत नाही असं मी दाखवीन.

 • मला वाईट सवयी लागू देऊ नका. वाईट सवयी लागत असल्या तर तुम्हीच लक्ष ठेवा आणि त्या लगेच मोडून काढा. मी त्यासाठी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

 • माझे फार लाड करू नका. मी मागीन ते मला मिळालंच पाहिजे असं मला वाटत नसतं, फक्त मी तुमची परीक्षा घेत असतो.

 •  मी आहे त्यापेक्षा लहान आहे, असं समजून मला वागवू नका. मला मग मूर्खासारखं मोठं असल्यासारखं’ वागावं लागतं.

 •  माझ्या चुका म्हणजे जणू काही पापच आहे असं मला वाटू देऊ नका. त्यामुळे माझा मूल्यांवरचा विश्वास उडेल.

 •  मला प्रयोग करायला आवडतात हे विसरू नका. मला त्याशिवाय राहवतच नाही. तेव्हा कृपया माझे प्रयोग सहन करा.

 • माझ्या बारीक-सारीक तक्रारींकडे फार लक्ष देऊ नका कारण तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं एवढ्यासाठीच त्या असतात.

 • कधी असं तर कधी तसं, असं विसंगत बोलू नका. तुमच्या बोलण्यात सुसंगती असू द्या. नाहीतर माझा गोंधळ उडतो आणि तुमच्यावरचा विश्वासही.

 •  मी जे करीन त्याचे परिणामही मला भोगू द्या. कधी-कधी अशाही मार्गानं शिक्षण होतं ते हवंच असतं.

 • तुम्ही कधीच चुकत नाही, असं चुकूनही मला सांगू नका. मग तुमचं चुकलं की मला फार मोठा धक्का बसतो.

 • मी किती वेगानं वाढतो आहे हे विसरू नका. माझ्या वाढण्याच्या वेगाशी जुळवून घेणं कठीण जातं पण प्रयत्न करा.
 • तुमची तब्येत निरोगी ठणठणीत ठेवा. मला तुमची खूपच जरूरत आहे.
chikupiku

Shobha Bhagwat

बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका 

संचालिका, गरवारे बालभवन 

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop