fbpx
चिकूपिकू दिवाळी विशेषांक २०२२

चिकूपिकू दिवाळी विशेषांक २०२२ (ChikuPiku Diwali Vishesh Ank 2022)

मुलांची दिवाळीची सुट्टी स्पेशल करणारा चिकूपिकू दिवाळी अंक! मोठ्यांनी छोट्यांबरोबर वाचावा असा खास चिकूपिकू दिवाळी अंक! गोष्टी, चित्र, ऍक्टिव्हिटीज आणि मजा-मस्ती घेऊन आलेला चिकूपिकू दिवाळी अंक!

या वेळच्या दिवाळी अंकात प्रवास हा विषय घेऊन आलो आहोत. मुलांना प्रवासाचं आकर्षण खूप असतं. सतत नावीन्याची गरज असलेला त्यांचा मेंदू, दिसेल ती गोष्ट टिपून घेत असतो. एकंदर प्रवासातली गंमत, मजा, सहप्रवासी, अडचणी, रोमांच आणि आनंद हे सगळंच नंतर खूप काळ ऊर्जा देत राहतं. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची ही सफर नव्या, जुन्या,अनोळखी, धमाल ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदबादची सफर, परग्रहावरची सहल अश्या फॅंटसीज आहेत.

200.00

83 in stock

एखाद्या वस्तूचा आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी कसा प्रवास होतो त्याची गंमत आहे, वेगवेगळ्या वाहनांच्या गोष्टी आहेत, भरपूर कोडी आणि खेळ आहेत, चित्रांच्या, रंगवण्याचा activities आहेत आणि 'गाडी आली.. गाडी आली' सारखी ठेक्यात म्हणता येतील अशी गाणीही आहेत.

या गाडीत मुलांचा हात धरून आपणही चढलो आहोत. एकत्र गोष्टी वाचू, गप्पा मारू चित्रं काढू, रंगवू, हातांनी वस्तू बनवू, मस्ती करू, मजा करू! खरं तर आपण सगळेच एकाच गाडीतून जाणारे सहप्रवासी आहोत. एकत्र मिळून आपल्यासाठी आणि मुलांसाठी या प्रवासातल्या गोड आठवणी साठवून ठेवू या.

अंकात वेगवेगळ्या शैलीतली चित्रं आहेत. मुलांशी चित्रांविषयी गप्पा मारता येतील. एकत्र मिळून नवीन गोष्टी, गाणी तयार करता येतील. 

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

ISSN

RNI TC No. MAHBIL10083

No. of Pages

68 (All four coloured)

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू दिवाळी विशेषांक २०२२”

Your email address will not be published. Required fields are marked *

चिकूपिकू वार्षिक मेंबरशीप

या दिवाळी अंकासह वर्षभर प्रत्येक महिन्याला 1
असे एकूण १0 अंक घरपोच.

₹1200   ₹1500

चिकूपिकू दिवाळी विशेषांक 2022

धमाल गोष्टी, गाणी आणि हटके
ऍक्टिव्हिटीज असलेला विशेषांक!

₹200 

१ ते ११ वयोगटातील मुलांसाठी
काय आहे या विशेषांकात?

मुलांना आवडतील अशा गोष्टी, काही जुन्या – काही नवीन पण म्हणताना हमखास मजा येईल अशा कविता, कोडी आणि आईबाबांबरोबर एकत्र करता येतील अशा धमाल ऍक्टिव्हिटीज!
previous arrow
Slide
सिंदबादची आठवी सफर :

सिंदाबादच्या ७ सफरींची गोष्ट वाचून झोपी गेलेल्या समीरने त्याच्या स्वप्नात पुढची एक धमाल, साहसी सफर पूर्ण केली. काय झालं असेल त्याच्या स्वप्नात? वाचूया या गोष्टीत

Slide
नेचर आणि मी :

हत्तींच्या कळपातला एक पिल्लू हत्ती आईबरोबर एका उंच डोंगरावर चालला होता, पण मध्येच एका फुलपाखराच्या मागे पळता पळता तो वाट चुकला. मग पुढे काय झालं? त्याला कोणी मदत केली? त्या उंच डोंगरावर काय होतं? वाचूया या गोष्टीत.

Slide
हातांची जादू :

दिवाळीच्या सुट्टीत चिंगीला तिच्या आजीकडे जायचंय. हे खेळणं बनवून तिला आजीच्या गावी पोहोचावू या.

Slide
तीन चांदण्या :

एकदा तीन चांदण्यांना काही पक्षी एका डोंगराच्या पार जाताना दिसले, तिकडून छान छान आवाजही यायचे. मग त्यांनी स्वत: प्रवास करून
तिकडे जायचं ठरवलं. त्यांना वाटेत कोण कोण भेटलं, त्यांनी तिकडे काय पहिलं? हे वाचूया

Slide
चॉकलेटची जर्नी :

मुलांना चॉकलेट खूप आवडतं, पण हे चॉकलेट नेमकं येतं कुठून, कसं बनतं हे माहितीय का? चला जाणून घेऊ या टेस्टी चॉकलेटचा गमतीदार प्रवास.

next arrow
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop